नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि द सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित एस.ए. मिशन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ चा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे होते,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ राजेंद्र चौधरी सोबतच व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील,सचिव पुष्पेंद्र रघुवंशी
डॉ.सुहास भावसार,माजी प्राध्यापक जी. टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार, डॉ.उमेश भदाणे तंत्र अधिकारी,जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नंदुरबार. डॉ.नंदा वसावे प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय एन.टी.व्ही.एस. नंदुरबार. डॉ. धनंजय पाटील व्याख्याता, जी.टी.पाटील महाविद्यालय, नंदुरबार. डी. के. बोरसे,माजी प्राचार्य एग्रीकल्चर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
खांडबारा,नवापूर. डॉ. संदीप भदाणे,जिजामाता शिक्षण संस्थेचे, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, नंदुरबार. डॉ. संजय शिंदे,प्राचार्य जिजामाता शिक्षण संस्थेचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय
प्राचार्य नूतनवर्षा वळवी. उपप्राचार्य विजय पवार आदी उपस्थित होते, सर्व मान्यवरांचा प्राचार्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवातीस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या प्रदर्शनात विविध गटांतून नावीन्यपूर्ण प्रकल्पांची निवड करण्यात आली. प्रमुख विजेते खालीलप्रमाणे आहेत-
*उच्च प्राथमिक गट (इ. ६ वी ते ८ वी)*
*प्रथम क्रमांक: अर्णव दिनेश पाटील (प्रकल्प: जिवा शिवा द फार्मर्स फ्रेंड), श्रीमती एस. जी. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार.
*द्वितीय क्रमांक: छत्रसाल राहुल साळुंखे (प्रकल्प: MAGIC TABLE), श्री शिवाजी हायस्कूल, नवापूर.
*तृतीय क्रमांक:चैतन्य मनोहर धनगर (प्रकल्प:सुगम वॉकर) श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय, नंदुरबार
*राखीव गटात आयुष गणेश गावित(प्रकल्प:आदिवासी बालकांचे सुरक्षा कवच) अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा सोनखांब तालुका नवापूर
*माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (इ. ९ वी ते १२ वी*
*प्रथम क्रमांक: कु. हर्षाली अनिलगीर गोसावी (प्रकल्प: Ultra Promax Disaster), व्हॉलंटरी माध्यमिक महिला मंडळ शाळा, शहादा.
*द्वितीय क्रमांक: कु. आर्या कुंदन सोनवणे (प्रकल्प: Traveller Helper Gadget), एस. ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार.
*तृतीय क्रमांक:नचिकेत विवेक अर्थेकर (प्रकल्प: ॲडव्हान्स फायर फायटिंग रोबोट) एकलव्य विद्यालय नंदुरबार.
राखीव गट:कैलास उकर्या पावरा (प्रकल्प:शाश्वत शेती) नेताजी सुभाष चंद्र बोस आ. वि. तोरणमाळ
*दिव्यांग गट: काजी निदा फातेमा खलील अहमद (प्रकल्प: Eco Friendly Bio enzyme cleaner), अँग्लो उर्दू हायस्कूल, नंदुरबार.
*शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक गट*
*उच्च प्राथमिक: सौ. भाग्यश्री विजयकुमार पटेल (अभिनव विद्यालय, नंदुरबार).
*माध्यमिक: श्री. तनेश नामदेव चौधरी (कुबेर हायस्कूल, म्हसावद).
*प्रयोगशाळा सहाय्यक: श्री. गौरव सुरेश वळवी (समता विद्यालय, धानोरा.
कार्यक्रमाचे आकर्षण-
*सॅम रोबोने मान्यवरांना व्यासपिठावर नेणे.
*अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण.
*रिमोट ने दीप प्रज्वलन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कुवर व डॉ.गायत्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी यांनी कले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








