Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

team by team
December 31, 2025
in राज्य
0
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या सर्रास वापरामुळे होणाऱ्या गंभीर अपघात, जखमा आणि मृत्यूच्या घटनांची गंभीर दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नायलॉन मांजाचा वापर व विक्री पूर्णतः प्रतिबंधित केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

*प्रस्तावित दंडात्मक कारवाई:*
• *अल्पवयीन व्यक्ती:* अल्पवयीन व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, त्यांच्या पालकांना न्यायालयात रुपये 50 हजार जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.
• *प्रौढ व्यक्ती:* प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास, संबंधित व्यक्तीला न्यायालयात रुपये 50 हजार रक्कम जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.
• *विक्रेते/साठादार:* नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा करताना आढळल्यास, प्रत्येक वेळी रुपये 02 लाख 50 हजार रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश का देऊ नयेत, अशी विचारणा केली आहे.
• *सुनावणीची पुढील तारीख:*
या प्रस्तावित कारवाईविरोधात कोणास हरकत किंवा म्हणणे मांडायचे असल्यास, त्यांनी पुढील सुनावणीच्या दिवशी, म्हणजेच 05 जानेवारी, 2026 रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे. जर कोणीही न्यायालयात हजर राहून हरकत मांडली नाही, तर सार्वजनिकरित्या या दंडात्मक कारवाईस कोणाचीही हरकत नाही, असे गृहीत धरले जाईल.

 

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही सार्वजनिक सूचना दिली असून, नायलॉन मांजाचा वापर किंवा विक्री केल्यास संबंधित व्यक्ती कायदेशीर व आर्थिक परिणामांना पूर्णतः जबाबदार राहील, असे स्पष्ट केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post
कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add