Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्थानिक स्वराज्य निवडणूका म्हणजे कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक : भाई नगराळे

team by team
October 28, 2025
in राजकीय
0
स्थानिक स्वराज्य निवडणूका म्हणजे कार्यकर्त्यांना संधी देण्याची निवडणूक : भाई नगराळे

नंदुरबार l प्रतिनिधी-

बूथ मॅनेजमेंट, त्याचप्रमाणे बूथ क्षेत्रातील मतदार याद्या मतचोरी होऊ नये म्हणून नीट तपासून घ्यावी, एकाच पत्त्यावर किती मतदारांची नोंदणी झालेली आहे हे तपासून प्रत्येक मतदाराची खात्री करून घ्यावी. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या निवडणूक आहेत. त्यांचा सन्मान करण्याची वेळ आहे असे प्रतिपादन भाई नगराळे यांनी केले.

नंदुरबार जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे उपस्थित होते. यावेळी खा.ऍड.गोवाल पाडवी,माजी मंत्री ऍड.के.सी.पाडवी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.प्रकाशराव सोनवणे, नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्रकुमार गावित, किसान सेलचे प्रदेश चिटणीस देवाजी चौधरी, पंडित पवार, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी, दिशा समितीचे सदस्य खंडेराव पवार, माजी न.पा.सदस्य इकबाल खाटीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून स्थानिक पातळीवर आघाडीमधील पक्षांबरोबर चर्चा करावी आणि ठराव करावा अशी श्रेष्ठींची इच्छा आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये कोणीही जाऊ नये असा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर युतीमधील कोणत्याही पक्षाशी तडजोड करू नये असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश पातळीवरून देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेसाठी प्रत्येक तालुका आणि तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आणि राज्य तसेच देश पातळीवरील मुद्दे घेऊन जाहीरनामा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

पक्षाच्या तालुकावर बैठका झाल्यानंतर प्रत्येक गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले. राजेंद्रकुमार गावित यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

Next Post

डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ

Next Post
डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ

डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई-बस सेवेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add