नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर परिसरात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला.मात्र त्यानंतर एक ते दीड महिने पावसाने दडी मारली व नंतर अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली. त्यामुळे तोंडातील घास फिरायला गेला आहे. हातात आले पिक वाया गेल्याने शेतकरी हवाली झाला आहे. त्यामुळे पीक पाहणी आणेवारी 50 टक्क्याच्या आत लावण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील भालेर परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडला. मात्र त्यानंतर सुमारे दीड महिने पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला.शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने परिस परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. साधारण अर्धा तास जोरदार वाऱ्यांसह बरसलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्याला बसला आहे.
या भागातील मोठ्या प्रमाणात केळी व पपई जमीनदोस्त झाली आहे. तर खरीप हंगामातील कापूस, मका व ज्वारी शेतात आडवी झाली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. आधीच त्रस्त असलेला शेतकरी थोडेफार असलेले पीकही हातातून गेले व उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे भालेर, वडवद परिसरात पिक पाहणी आणेवारी ५० टक्क्याचा आत लावण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे भालेरच्या सरपंच सौ. कविता पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर चंद्रशेखर पाटील, जगदीश पाटील, पी.पी. बागुल, एकनाथ पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भालेर परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे ही मागणी करण्यात आली आहे.








