नंदुरबार l प्रतिनिधी-
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज जिल्हा अधिकारी मित्ताली सेठी यांचा हस्ते प्रणव गावित याचा सत्कार करण्यात आला.
होहहॉट,चीन येथे 13 व 14 सप्टेंबर दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता प्रणव गावित याची निवड झाली होती तो नुकताच भारतात परतला असून यानिमित्ताने शाळेत प्रणव गावित याचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रसंगी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी,उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे,गटशिक्षणअधिकारी जयंत चौरे, क्रीडा अधिकारी ओंकार जाधव, संजय बेलोरकर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष इसरार सय्यद,सदस्य राजेश्वर चौधरी,श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह,मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील व कपूरचंद मराठे आदी उपस्थितीत होते.
तसेच एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रायमरीचे प्रिंसिपल संदेश यंगड तसेच एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल पराग पोळ,एस.ए.मिशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कालू ,पत्रकार रमाकांत पाटील,लायन्स क्लबच्या अध्यक्षा बोरसे आदी उपस्थितीत होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की खेळाडू घडवण्यासाठी जिल्ह्यामध्ये अजून काय हवे आहे कमी साधनांमध्ये मेहनत करून पुढे जाणे खूप अवघड असते खेळाडू पुढे जात असताना त्याच्या पाठीमागे खूप लोक मेहनत घेऊन सपोर्ट करत असतात बाहेर स्पर्धेला जाताना खेळाडूला काय लागते याकरिता खेळाडूंची एक टीम तयार करण्यात येईल व त्या टीमचा लीडर प्रणवलाच बनवला जाईल आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खेळाडूंसाठी क्रीडा संकुल उभारण्यात येतील. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू प्रणव गावित व त्यांचे प्रशिक्षक खुशाल शर्मा यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले.