नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील नं. ता. वि. समिती संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करीत शाळेचे नाव गौरविले आहे.
विजेत्या विद्यार्थिनी
तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा* – विजेते विद्यार्थीनी :
१) १४ वर्षांखालील मुली १०० मीटर धावणे स्पर्धेत
राधिका नारसिंग वसावे- द्वितीय
शीतल लालसिंग पावरा- तृतीय
२) १७ वर्षांखालील मुली दोनशे मीटर धावणे शर्यतीत
अश्विनी सामसिंग पावरा- द्वितीय
३) १४ वर्षांखालील मुली उंचउडी राजश्री पांडुरंग पाटील- द्वितीय
४)१७ वर्षांखालील मुली उंच उडी
करिश्मा देटका पावरा -द्वितीय
५) १७ वर्षांखालील मुली तिहेरी उडीत अश्विनी सामसिंग पावरा-प्रथम
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा – विजेते :
१) आदित्य मिलिंद पिंपळे
१०० मी. फ्री-स्टाईल : प्रथम
१०० मी. बॅक स्ट्रोक : प्रथम
४०० मी. फ्री-स्टाईल : प्रथम
२) तनुश्री मिलिंद पिंपळे
५० मी. फ्री-स्टाईल : प्रथम
१०० मी. फ्री-स्टाईल : प्रथम उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी,व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, सचिव यशवंतराव पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल, पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील तसेच प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक ए.एस.शिंदे व एन.जी.पाटील, के.जी.बेडसे यांनी मार्गदर्शन केले.