नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का.वि.प्र.स. संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचे नाव उजळून काढले आहे.
१. प्रियांका सुरेश वळवी सातवी ,
२०० मीटर धावण्याच्या शर्यतीत- दुसरा क्रमांक,
तसेच,१४ वर्षे वयोगटातील उंच उडीत- पहिला क्रमांक
२. उर्मिला सुभाष वळवी ११ वी, सतरा वर्ष वयोगटात उंच उडीत – पहिला क्रमांक
३. जान्हवी भाऊसाहेब धनगर दहावी,
तेहरी उडीत- दुसरा क्रमांक
४.भाविकाविनोदपाटीलदहावी
चालण्याच्या शर्यतीत -पहिली
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील , कार्याध्यक्ष विजय पाटील व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक शिक्षिका वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थिनींच्या मेहनतीचा आणि शिस्तीचा हेच उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यामुळे विद्यालयाची गौरवगाथा कायम ठेवली आहे.