नंदुरबार l प्रतिनिधी-
स्वच्छता ही सेवा 2025 उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते कोठली खु. ता. जि. नंदुरबार येथे ग्रामस्थ् व विद्यार्थी यांना स्वच्छतेची शपथ देवून करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित ,डॉ. सुप्रिया गावित,. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांनी स्वच्छता ही सेवा ची शपथ देऊन गावात शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे तसेच सांडपाण्याची व्यवस्थापन योग्यरीत्या करणे बाबत आवाहन केले.
यानंतर डॉ. विजयकुमार गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, गटविकास अधिकारी अनिल बिराडे ,सरपंच महेंद्र वळवी, उपसरपंच जगदीश पाटील विस्तार अधिकारी वाय डी. पाटील ,एस.व्ही.दसपुते यांच्या उपस्थितीत परिसर स्वच्छता करून स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला