सैनिकी विद्यालयाच्यावतीने बालशहिदांना अभिवादन
नंदुरबार l प्रतिनिधी
१९४२च्या चले जाव आंदोलनाच्या स्मृती जागविणाऱ्या शहीद स्मारकाला के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथील विद्यार्थ्यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले तसेच मानवंदना देण्यात आली.
सर्वप्रथम पोलीस ग्राउंड येथून निघालेल्या रॅलीत सैनिकी गणवेशात पथसंचलन करत स्मारक चौकापर्यंत आल्यानंतर सैनिकी शाळेतील शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल व प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी बाल शहिदांना मानवंदना दिली. त्यानंतर आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, सचिव ऋषिकाताई गावित तसेच आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळाच्या सचिव डॉ. विभूती गावित यांच्या हस्ते बाल शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे ,शाळेचे प्राचार्य शरद पाटील, श्रीमती नीलिमा वाघ, रोहित पाटील ,काशिनाथ सूर्यवंशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी बाल शहिदांना अभिवादन केले. याप्रसंगी ‘भारत माता की जय’, वंदे मातरम्, ‘बाल शहीद अमर रहे’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.