Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

team by team
August 2, 2025
in राजकीय
0
तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

तोरणमाळ पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घेतला आढावा

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या तोरणमाळ परिसराच्या पर्यटन विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली. या दौऱ्यात पर्यटनाशी संबंधित अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली व विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांना ठोस निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सिताखाई पॉईंट, झिप लाईन लोकेशन, थीम पार्क, बोटनिकल गार्डन, बोटिंग पॉईंट, तसेच तोरणमाळ हॅट्स या महत्वाच्या स्थळांना भेट दिली. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन पर्यटनवाढीच्या दृष्टीने आवश्यक कामांचा आढावा घेतला.

⦁ बैठकीतील मुख्य निर्देश व मुद्दे:
PWD विभागास मुख्य व अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश.
होम स्टे प्रकल्पासाठी तत्काळ विद्युत जोडणी देण्याबाबत सूचना.
होम स्टेच्या इंटिरियर देखभाल व सौंदर्यीकरणासाठी त्वरित उपाययोजना.
वन विभागास पर्यटकांना सफारीसाठी आवश्यक वाहने खरेदी करण्याची कार्यवाही.
झिप लाईन प्रकल्पासाठी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक वाहनांची खरेदी.
थीम पार्कसाठी प्रस्तावांची सविस्तर तयारी करून पुढे सादर करण्याचे निर्देश.
या दौऱ्यात माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वन व पर्यटन विभागात समन्वय साधून कामे करण्यावर भर देण्यात आला. स्थानिकांचे उत्पन्न वाढवणे, महिलांना स्वयंपूर्ण बनवणे आणि परिसरात शाश्वत पर्यटन संधी निर्माण करणे हे या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.

या बैठकीस MAVIMच्या कांता बनकर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता S.D. पवार, सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके (शहादा), वनक्षेत्रपाल महेश चव्हाण (तोरणमाळ), तहसीलदार अक्राणी सपकाळे साहेब, तसेच तोरणमाळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मॅडम यांच्या दौऱ्यामुळे तोरणमाळ पर्यटन विकासाला नवी दिशा आणि गती मिळणार आहे, अशी स्थानिक जनतेत आणि प्रशासनात सकारात्मक भावना दिसून आली.

बातमी शेअर करा
Previous Post

द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

Next Post

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका, शहादा तालुक्यात कारवाई

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका, शहादा तालुक्यात कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका, शहादा तालुक्यात कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add