नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार येथे आयोजित महा रक्तदान शिबिरात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात येथे नंदुरबार शहर व ग्रामीण मंडळ आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची रीग लागली होती. ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार राज्यभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात बारा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळाला नंदुरबार शहरात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ.डॉ.विजयकुमार गावित, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, मा.जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित सह शेकडो कार्यकर्त्यांनी महारक्तदान शिबिरात सहभाग घेतला व रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सेवाभावी शुभेच्छा दिल्या.
नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सपना अग्रवाल व सदानंद रघुवंशी, शहराचे अध्यक्ष नरेश कांकरिया, ग्रामीण अध्यक्ष दिपक पाटील, डॉ गणेश चव्हाण, धानोरा मंडळाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.