Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

team by team
May 20, 2025
in क्राईम
0
अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्रीला जात असताना पोलिसांचा छापा, तीन ट्रकांसह 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार l प्रतिनिधी

अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळया बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत
3 ट्रकांसह तब्बल 53 लाख 76 हजार 630 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर येथुन ट्रक ( क्रमांक MH 23 AU 9900) , ट्रक ( क्रमांक MH 18 BG 1911) तसेच ट्रक क्रमांक (  MH 20 EL 9692) यांच्यात रेशनिंगचे तांदुळ गोणपाट मधुन काढुन घेऊन ते पांढऱ्या गोणीत भरुन विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळया बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत, बाबत खात्रिशिर माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाईकामी रवाना केले.

मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोलपंप समोर रोडावर योग्य सापळा रचला असता तिनही ट्रक काही वेळाचे अंतराने आले असता त्यांना थांबविण्यात आले व त्यावरील वाहन चालकांना त्यांची नावे गावे विचारता 1) ट्रक क्रमांक MH 23 AU 9900 वरील चालक नामे अमोल प्रल्हाद गिरे, रा. डोयफळवाडी, ता. गेवराई, जि.बीड, 2) ट्रक क्रमांक MH 18 BG 1911 वरील चालक नामे रावसाहेब फकीरराव दिघोळे,रा. निंभोरा पोस्ट कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर तसेच ट्रक क्रमांक MH 20 EL 9692 वरील चालक नामे सचिन बाळासाहेब पवार, वय 30 वर्षे, रा. खातखेडा, ता. कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. त्यांना ट्रकमध्ये काय माल आहे बाबत विचारणा करता ट्रक क्रमांक MH 23 AU 9900 हिचेत अजिंठा येथुन मितेश गांधी, रा. नागपुर यांचा तांदुळचा माल असुन ट्रक क्रमांक MH 18 BG 1911 व MH 20 EL 9692 यांच्यातील तांदुळ हा ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसिम, रा. छत्रपती संभाजीनगर यांचा असुन तिनही ट्रकमधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सदर घेऊन जात असलेल्या तांदुळाचे मालाचे वैध पावात्यांबाबत विचारता त्यांचेकडे वैध पावत्या नसल्याचे दिसुन आले.

तसेच पथकाने ट्रकांमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाच्या तांदुळ भरलेल्या गोण्या मिळुन आल्या. गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदुळची पाहणी करता तो साठवणुक केलेला रेशनचा जुना तांदुळ असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे दिसुन

आले. त्याअन्वये नमुद तिनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ताब्यात घेतले. सदर तिनही ट्रकमधुन एकुण 856 क्विटल रेशनचा तांदुळ व वाहन असे मिळुन 53,76,630/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्याअन्वये आरोर्पीविरुध्द विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.- 150/2025 जिवनाश्यक वस्तु अधि. 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकाँ/राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, बापु बागुल, पोना/जितेंद्र तोरवणे, पोकॉ, राजेंद्र काटके अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा,तळोदा पालिका निवडणुक युतीने लढवणार,अन्यथा ‘एकला चलो रे ‘ ; आ.चंद्रकांत रघुवंशीं

Next Post

रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

Next Post
रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

रोडाली लोककला आदिवासी लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक; आ.चंद्रकात रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add