नंदुरबार l प्रतिनिधी
पंचायत समितीच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत धुळवद ता.नंदुरबार येथील ११ लाभार्थ्यांना सिंचन विहिरींसाठी ५४ लाख ९९ हजार ९८९ रुपयांचा आदेशांचे वाटप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळवद ता.नंदुरबार येथील ग्रामस्थांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रशासकीय स्तरावरून सतत पाठपुरावा केला असता गावातील ११ जणांचे प्रस्ताव मंजूर केले.
सोमवारी आमदार कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते गावातील शत्रु वळवी,पिंटू वळवी,अशोक ठाकरे, ममता पटेल,नितीन पटेल,सुप्रिया परदेशी,पुष्पा पटेल,हिराबाई मराठे,मुकेश पटेल आमसू ठाकरे,वसंत पाडवी यांना सिंचन विहिरींच्या आदेशांची वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती विक्रमसिंह वळवी, धर्मेंद्र परदेसी,पं.स माजी उपसभापती कमलेश महाले, धमडाईचे सरपंच विजय पाडवी, शिवसेना पदाधिकारी अमृतसिंग पावरा,पं.स माजी सदस्य बापू पाटील,नारायण ढोडरे, देवेंद्र आघाव उपस्थित होते.