नंदुरबार l प्रतिनिधी-
श्रीमती के.पी. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे शिवजयंती उत्साहात संपन्न झाली.
श्रीमती के. पी. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.जि. नंदुरबार येथे शिवजयंती निमित्त शिवप्रतिमेचे पूजन काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, माजी पर्यवेक्षक पी.पी. बागुल, संस्थेचे हितचिंतक वासुदेव आत्माराम पाटील, प्रताप पाटील तसेच शाळेच्या प्राचार्य सौ. विद्या बी. चव्हाण, पर्यवेक्षक एम. बी .अहिरे, प्राध्यापक- प्राध्यापिका शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली. पोवाडे व गीताचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. शिवाजी महाराजांच्या शौर्याचा व पराक्रमाचा इतिहास सांगितला गेला. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.व्हि.ईशी यांनी केले.