Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: हिंदु सेवा सहाय्य समितीचा इशारा, भाजपातर्फेही मागणी

team by team
December 14, 2024
in राजकीय
0
प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: हिंदु सेवा सहाय्य समितीचा इशारा, भाजपातर्फेही मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लेट फ्रॉम क्रमांक तीनचा पलीकडे नवीन टिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे. त्याठिकाणी तिकीट काढण्यासाठी पटेलवाडी, बादशहा नगर असे कॉलनी परिसरातून येण्यास प्रवाशांना त्रास होईल म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी त्याठिकाणी करू नये तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समिती आणि नागरिकांनी वरीष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर राजेश रंजन यांचा मार्फत दिले.

नंदुरबार शहराच्या रेल्वेपट्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर शहर विकसित होत आहे, त्या दृष्टीने नवीन टिकीट खिडकी होणे आवश्यक आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पटेलवाडी- बादशहा नगर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग जवळ प्रस्तावित नवीन टिकीट खिडकी बनविणार आहे. पटेलवाडी किंवा बादशहा नगर हे कॉलनी परिसर आहे. त्या भागातून प्रवाशांना आपली वाहने घेऊन जाऊन टिकीट काढणे शक्य नाही, कारण कॉलनीचे रस्ते अतिशय लहान आहेत आणि त्यातही कॉलनीची रहदारी असते. त्यामुळे पुढील भविष्याचा विचार करता या भागातून प्रवाशांना टिकीट खिडकीपर्यंत जाणे अवघड होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सदर नवीन तिकीट खिडकी ही भगवा चौक म्हणजे उड्डाणपुलाच्या खालच्या भाग किंवा बर्फ कारखाना याच्या समोरील भागास केले तर सर्व प्रवाशांना सोयीचे होईल. जनभावनांचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने त्याचठिकाणी टिकीत खिडकी बनविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

*भाजपातर्फेही देण्यात आलेली निवेदन*

नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लेट फ्रॉम क्रमांक 3 पलीकडे नवीन टिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे. तेथे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना पटेलवाडी, बादशहा नगर असे कॉलनी परिसरातून येण्यास त्रास होईल, म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे टिकीट खिडकी त्याठिकाणी करू नये या संदर्भातील निवेदन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी वरीष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनिअर राजेश रंजन यांचे मार्फत देऊन चर्चा केली.

बातमी शेअर करा
Previous Post

16 डिसेंबर पासून शेतकऱ्यांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणी,शेतकरी बांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे : डॉ. मित्ताली सेठी

Next Post

नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add