नंदूरबार l प्रतिनिधी-
केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाहाविरोधात एकलव्य विद्यालय आणि कमला नेहरू विद्यालय नंदूरबार येथे शपथविधी समारंभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 1351 एकलव्य हायस्कूल
1024 कमला नेहरू विद्यालय विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनी मिळून जिल्हा बालविवाहमुक्त करणार असा संकल्प केला· सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या 250 हून अधिक एनजीओ भागीदारांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आज केंद्र सरकारने बालविवाह विरोधी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सुद्धा जिल्ह्यात सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कार्ड च्या सहकार्याने रॅल्या, शपथविधी समारंभ आयोजित करत आहे.
जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन (जेआरसी) हे देशभरातील 400 हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या 250 पेक्षा जास्त बाल संरक्षण एनजीओ भागीदारांचे राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड ही त्याचा भागीदार आहे. जिल्हाभरात शेकडो ग्रामस्थ, ग्राम प्रमुख, बालविवाह संरक्षण अधिकारी (सीएमपीओ), आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि महिला यांनी शपथ घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. 27 नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ‘बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना बालविवाहविरोधी शपथ दिली असून ही मोहिम 25 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. बालविवाहाची माहिती देणे सोपे जावे म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आले.
या देशव्यापी मोहिमेबद्दल आणि त्यामुळे वास्तविक स्वरूपात त्यांचे काम लवकर कसे होईल, याविषयी बोलताना कार्डचे समन्वयक संजू सोनवणे म्हणाले, “बालविवाहांबाबत जनजागृती करण्यासाठी, असे कोणतेही विवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रमुख यांच्यासमवेत जिल्ह्यात काम करीत आहोत आणि त्यासोबतच सरकारच्या या मोहिमेमुळे या लढ्याला नवी ऊर्जा आणि पाठबळ लाभणार आहे.
अखेर बालविवाह संपुष्टात आल्याने इतकी वर्षे आम्ही ज्या लढाईत होतो ती संपण्याच्या मार्गावर आहे आणि हे पाहणे आम्हाला अत्यंत समाधान देऊन जाणारा क्षण आहे. बालविवाहाच्या गुन्ह्यापुढे भारत गप्प बसणार नाही आणि प्रत्येक मुलाला हक्काचे बालपण मिळावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे.
कार्डच्या अध्यक्ष प्राध्यापक सुवर्णा दांडगे उपाध्यक्ष डॉ. रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, सहसचिव रघुनाथ शेवाळे,संचालक ॲड.संतोष वानखेडेसंचालक सूनिता मगरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन आयोजन कार्डचे संजीव सोनवणे आरती अहिरे यांनी केले. या कार्यक्रमास गौतम तुकाराम वाघ (बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महीला आणि बाल विकास विभाग नंदुरबार.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य – उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार संतोष पाटील सुनील पाटील
कमला नेहरू कन्या विद्यालय – मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव उपमुख्याध्यापक सुनील पाटील संजय चौधरी रवींद्र सोनवणे, कार्ड चे संजू सोनवणे, आरती अहिरे यांनी परिश्रम घेतले