Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवींच्या नंदुरबार शहरात ‘होम टू होम’ प्रचार

team by team
November 15, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीचे उमेदवार किरण तडवींच्या नंदुरबार शहरात ‘होम टू होम’ प्रचार

नंदुरबार l प्रतिनिधी

महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांनी शहरात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात विविध प्रभागातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार किरण तडवी यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन विजयासाठी त्यांना आशीर्वाद देण्यात आला.

काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांना विधानसभा मतदार संघात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या त्या-त्या सर्वच ठिकाणी मतदारांनी त्यांचे स्वागत करीत विजयाच्या आशीर्वाद दिला. मतदार संघातील ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागात सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार किरण तडवी यांच्या प्रचार गीतांच्या माध्यमातून वातावरण ढवळून निघत आहे. ज्या ठिकाणी प्रचार फेरी असते त्या ठिकाणी महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वाटप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असते.

गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसात शहरातील विविध प्रभागातून प्रचार रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजर व मागोमाग कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसर ढवळून निघत आहे. ठिकठिकाणी महिला भगिनींकडून उमेदवार किरण तडवी यांचे औक्षण करण्यात येत आहे. पहिल्यांदाच निवडणुकीला उभा असल्यामुळे जनतेने सेवेची संधी द्यावी. असे आवाहन ते करीत आहेत. यावेळी माजी नगरसेवक किरण रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,,दीपक दिघे,विलास रघुवंशी,रवींद्र पवार,चेतन वळवी, मोहितसिंग राजपूत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दुर्गम भागात विकासाचा अनुशेष भरुन निघणार : डॉ.हिना गावित; स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्याची दिली ग्वाही

Next Post

नगाव येथील युवकांचा भाजपात प्रवेश

Next Post
नगाव येथील युवकांचा भाजपात प्रवेश

नगाव येथील युवकांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add