Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात गृह मतदानाला उत्साहात सुरूवात; रजाळे येथील १०१ वर्षांच्या उमताबाई गिरासे यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

team by team
November 15, 2024
in राज्य
0
जिल्ह्यात गृह मतदानाला उत्साहात सुरूवात; रजाळे येथील १०१ वर्षांच्या उमताबाई  गिरासे यांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

नंदुरबार l प्रतिनिधी-

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (14 नोव्हेंबर) गृह मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे आज नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील रजाळे येथील १०१ वर्षे वयाच्या आजी श्रीमती उमताबाई गिरासे यांनी अतिशय उत्साहात आपल्या घरून मतदानाचा हक्क बजावला.

 

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेंद्र चौधरी (नवापूर) यांच्या यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त 48 पथकांमार्फत हे मतदान सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.

 

गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये अक्कलकुवा-221, शहादा-257, नंदुरबार-383, नवापूर-285 असे एकूण 1 हजार 164 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.

 

 

गृहमतदानासाठी विधानसभाक्षेत्रात नियुक्त 48 पथके गृह मतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेत आहेत. गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहता येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर दर्शनासाठी झाले खुले

Next Post

अक्कलकुवा येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

Next Post
अक्कलकुवा येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

अक्कलकुवा येथील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add