Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वादळी पावसाने उद्ध्वस्त शेतीची ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी केली तातडीने पाहणी

team by team
October 24, 2024
in राजकीय
0
वादळी पावसाने उद्ध्वस्त शेतीची ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी केली तातडीने पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील कोंढावल आणि नजीकच्या गावांमध्ये परतीचा अवकाळी पावसामुळे व जोरदार वादळामुळे केळी व पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान; तातडीने या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

 

नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांसमवेत शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्याप्रसंगी अनेक ठिकाणी उध्वस्त झालेल्या केळी बागा दिसून आल्या. कापूस पपई आणि इतर पीक सुद्धा वादळाने उध्वस्त झालेले दिसले. संबंधित विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते त्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

 

शासकीय स्तरावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही होईल, असे सांगून याप्रसंगी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. उद्योजक शशिकांत भाई पाटिल, कृष्णा भाऊ कोली, लोकनियुक्त सरपंच गोपाल भील, समता परिषद नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, तंटा मुक्ति अध्यक्ष दिपक अहिरे, ग्रां पं सदस्य निंबा नाना माली, रूबदास भील, ब्रिजलाल भील, नारायण अहिरे वडाली उपसरपंच अभय गोसावी, भिमराव अहिरे, विष्णु भील,गणेश माली, युवराज शेवाले, संदीप महाले, संजय पटेल, राजेंद्र माली, कृष्णा भील, दीपक अहिरे,माना माली आदि सह गावकरी शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यात पोलिसांनी शेतात धाडी टाकून 24 लाखाचा गांजा केला जप्त

Next Post

निवडणूक कालावधीत आंदोलन, मोर्चा, निदर्शनांवर निर्बंध : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post
तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

निवडणूक कालावधीत आंदोलन, मोर्चा, निदर्शनांवर निर्बंध : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026
पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

November 21, 2026
शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 21, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

November 21, 2026
नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

November 21, 2026
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add