Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आश्रमशाळा, वसतीगृहांच्या शासकीय इमारतींसाठी १०० टक्के मंजूरी, ७ ऑक्टोंबर ला एकचवेळी राज्यातील सर्वांचे ऑनलाईन उद्घाटन करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
October 4, 2024
in राजकीय
0
आश्रमशाळा, वसतीगृहांच्या शासकीय इमारतींसाठी १०० टक्के मंजूरी, ७ ऑक्टोंबर ला एकचवेळी राज्यातील सर्वांचे ऑनलाईन उद्घाटन करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्यात आवश्यकतेनुसार आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह, आश्रमशाळा, शाळा यांना स्वमालकीच्या इमारतींसाठी १०० टक्के मंजूरी देण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील इमारतींना मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या ७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व इमारतींचे भूमिपूजन ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते काल जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत एकलव्य गॉडेल रेसिडेशीअल स्कूल, (रोषमाळ, ता. धडगाव) येथील संकुलात मुलांचे वसतिगृह, भोजन कक्ष, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक व कर्मचारी टाईप २ व टाईप ३ गृहपाल निवासस्थान (मुले /मुली), अतिथीगृह, क्रिडासुविधा, डिप बोअरिंग, पंप रूम. संरक्षण मित, अंतर्गत रस्ते. प्रवेश व्दार, ध्वजारोहन स्टेज इ. भूमीपुजन समारंभ, तसेच शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, (मोलगी, ता. अक्कलकुवा)
येथील मुलींचे वसतिगृह इमारतींच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, जि.प. सदस्य रूपसिंग तडवी, सरपंच ज्योती तडवी(मोलगी), दिलीप वसावे (सरी), आकाश वसावे (डाब), सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, प्रभात गायकवाड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, ज्या शाळांना प्रशस्त जागा आहेत, तेथे खेळाची मैदाने निर्माण करून क्रिडापटूंना प्रोत्साहन देण्याचा आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न आहे. ज्या शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे, तेथे स्वमालकीच्या इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात एकट्या तळोदा प्रकल्पातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील ३४ इमारतींचा समावेश आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात शिस्तबद्ध शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच येणाऱ्या दोन ते सहा महिन्यांत सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये आपल्याला बायोमॅट्रीक प्रणाली स्थापित झालेल्या दिसून येणार आहेत.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक गावात देवालये आहेत आणि त्या देवीलयांमधून रोज भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असतात, या सर्व भजनी मंडळांना कुठलाही भेदभाव न करता भजनाचे साहित्य जिल्ह्यात वितरीत करण्यात आले आहे. तसेच गावातील नवतरूणाईत असलेली क्रिकेट खेळाची गोडी लक्षात घेता प्रत्येक गावाला क्रिकेट साहित्याचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच बचतगटांच्या सक्षमीकरणातून गाई व बकरी पालनालाही प्रोत्साहन दिले जात आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सहज आणि शांततेने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम

Next Post

हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश, ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवरील देवी देवतांची चित्रे महाराष्ट्र शासनाने हलविली

Next Post
हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश, ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवरील देवी देवतांची चित्रे महाराष्ट्र शासनाने हलविली

हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश, 'आनंदाचा शिधा' पिशव्यांवरील देवी देवतांची चित्रे महाराष्ट्र शासनाने हलविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add