धडगाव l प्रतिनिधी
जंगल भागात अवैधरित्या वृक्षतोड करून साग लाकडाची वाहतुक केली जात होती. वनविभागाच्या पथकाने धाड टाकून ३६ हजार १३८ रुपयांचा साग चौपाट व साग दांड्यांचा लाकूडसाठा जप्त केला आहे. ही कारवाई भूषा वनविभागाच्या पथकाने सावऱ्यादिगर जंगल भागात केली आहे.
धडगाव तालुक्यातील बिलगाव प्रा. वनक्षेत्रातील भूषा परिमंडळात येणाऱ्या नियतक्षेत्र सावऱ्या या जंगल भागातून अवैधरित्या वृक्षतोड करुन साग लाकडाची वाहतुक केली जात होती. यावेळी गस्तीवर असलेल्या बिलगाव अक्राणी वनविभागाच्या पथकाने जंगल
भागात जावून अवैधरित्या वृक्षतोड केलेला लाकूडसाठा जप्त केल्याची कारवाई केली आहे. त्यात साग चौपाटचे ९६ नग १.५७५ घ.न.मी. असलेला ३१ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल व साग दांड्यांचे १० नग ०.२०८ घ.मी. असलेला ४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल असा एकुण ३६ हजार १३८ रुपयांचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सावऱ्याचे वनरक्षक व्ही. जी. पटले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वनगुन्हा भा.वं.अ.१९७६ २७ चे कलम २६ (१) डईफ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक संतोश सस्ते, रोहयोचे वनसंरक्षक एस.डी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलगाव (प्रा.) चे वनक्षेत्रपाल प्रशांत खैरनार यांच्या नेतृत्वाखाली माळचे वनपाल प्रतिभा बोरसे,भूषाचे वनपाल बी.एम. परदेशी,वनरक्षक व्ही.जी.पटले, अरविंद निकम, एम.एम. वळवी, यु.सी. पावरा,पवन पाडवी, देवीदास पाडवी, रोहीदास पावरा, श्रीमती एम.एन. पावरा, ज्योती पावरा, ज्योली वळवी, रेखा पावरा, बबीता वसावे, वाहन चालक हेमंत पावरा यांच्या पथकाने केली.