नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील श्री.विद्या सरोज हॉस्पिटल शाखा क्रं 2 येथे विद्या सरोज हॉस्पिटल व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी या शिबिराचा 200 च्या वर रुग्णांनी लाभ घेतला.
नंदुरबार येथील श्री.विद्या सरोज हॉस्पिटल शाखा क्रं 2 चे उद्घाटन 15 सप्टेंबर रोजी सौ.विद्यादेवी अशोक तांबोळी व श्रीमती सरोज मधुकर महाजन यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले होते.यावेळी अशोक रनछोड तांबोळी, डॉ.गौरव अशोक तांबोळी ( एम.बी.बि.एस.एम डी ( मेडीसिन), डॉ.स्वप्नील मधुकर महाजन एम.बी.बि.एस.एम डी, एस.सी.पी.एस (मेडीसिन),
डॉ.विधी गौरव तांबोळी, सौ.प्रियांका स्वप्नील महाजन आदी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, आरोग्य क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी
विद्यास्ररोज विद्या सरोज हॉस्पिटल शाखा क्रं 2 उद्घाटन निमित श्री.विद्या सरोज हॉस्पिटल व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 21 व 22 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन अशोक रनछोड तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ स्वप्नील महाजन,डॉ. गौरव तांबोळी, डॉ.हितेश पटेल, डॉ.संदीप पाटील, डॉ.सचिन अग्रवाल, डॉ.उर्मिला रामनानी,लायन्स क्लबचे अध्यक्ष शंकरभाई रंगलानी, सचिव दिनेश वाडेकर, ट्रेझरर मनोज पोखरणा, प्रोजेक्ट चेयेरमन शत्रूभाई बालाणी आदी उपस्थित होते.
यावेळी मोफत आरोग्य शिबिरात
BSL तपासणी, BP तपासणी मोफत, ECG गरज लागल्यास – मोफत पथॉलोजिकल टेस्ट-50 टक्के सवलत दरात करण्यात आली.यावेळी 200 च्या वर रुग्णांनी लाभ घेतला.