Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

औद्योगिक विकासातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणार : डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 29, 2024
in राजकीय
0
औद्योगिक विकासातून  स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी व येथील तरूणांना स्थानिक पातळींवर रोजगार निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार असून, गावातील ४० टक्के तरूणांना स्थानिक पातळींवर रोजगार देण्यासाठी प्रयत्नात असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते नंदुरबार तालुक्यातील घोटाने व चौपाळे येथे कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गृहोपयोग वस्तुंच्या संच वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी जि प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सरपंच सचिन धनगर, कामगार कल्याण मंडळाचे व्यवस्थापक प्रविण पाटील निलेश धनगर, डॉ. प्रविण धनगर, प्रदीप पाटील, सागर भामरे, कुणाल गोसावी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देवून स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना येथेच रोजगार, स्वयंरोजगार मिळवून दिला जाणार आहे. महिला बचत गटांनाही रोजगार-कौशल्याचे प्रशिक्षण देवून त्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. आज याठिकाणी बांधकाम कामगारांना १७ प्रकारच्या गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात येते.
कामगारांना त्यांचे सूरू असलेले काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन काम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते.

अशा स्थलांतराच्या ठिकाणी कामगारांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण,आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आजतागायत जिल्ह्यातील ५ हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तुंचे वितरण करण्यात आले असून भविष्यातही मागणीप्रमाणे कामगारांना गृहोपयोग वस्तू दिल्या जातील. तसेच मजूर, कामगारांना सेफ्टी किट, आरोग्य सेवा, कामगारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या विवध योजना राबवल्या जात असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

घोटाने येथील कार्यक्रमात घोटाने, न्याहली, कार्ले, खोकराळे, आसाने येथील ३०० कामगारांना तर चौपाळे येथील कार्यक्रमात चौपाळे, अकराळे, चाकडे, भोणे, वटबारे, वावद, वासदरे, दुधाळे येथील ३०० कामगारांना गृहोपयोगी वस्तुंचे संच व कामगार सुरक्षा संचांचे वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते करण्यात करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून 57 जणांना दीड कोटींची मदत, जिल्हाध्यक्षपदी पप्पू गिरासे

Next Post

लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गावागावातील वयोवृद्धांना देणार वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेचा लाभ; 29 रोजी नोंदणी शिबिराला उपस्थित रहा : मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add