Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गावागावातील वयोवृद्धांना देणार वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेचा लाभ; 29 रोजी नोंदणी शिबिराला उपस्थित रहा : मंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
August 29, 2024
in राजकीय
0
लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गावागावातील वयोवृद्धांना देणार वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेचा लाभ; 29 रोजी नोंदणी शिबिराला उपस्थित रहा : मंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख हून अधिक महिलांना आपण लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला त्याच धर्तीवर आता गावागावातील वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. त्यासाठीच उद्या 29 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार येथे नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी नंदुरबार तालुक्यातील जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी वस्तू वाटप कार्यक्रमात केले.

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी नंदुरबार तालुक्यातील घोटाणे आणि चौपाळे परिसरातील लाभार्थ्यांना गृहपयोगी वस्तुसंचांचे आणि सुरक्षा संच पेटींचे वाटप करण्यात आले.. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष जे एन पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सोमूभैय्या राजपूत, मुन्ना पाटील, आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

 

नामदार डॉक्टर विजयकुमार गावित भाषणात पुढे म्हणाले,राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. कष्ट करणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त आधार आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आतापर्यंत वस्तू संच आणि सुरक्षा संच वाटपाचा लाभ जवळपास दहा हजार जणांना दिला पुढे आणखी 25 हजार जणांना लाभ देणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळवून देत आहोत. स्थलांतर थांबावे म्हणून रोजगार दिला गृह उद्योग दिले शेळी गाई वाटप करून जोडधंदे दिले.

 

कामगारांच्या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील एक लाखाहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आता 65 वर्ष वयावरील वयोवृद्ध लोकांनासुध्दा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार येथील नाट्य मंदिरात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त वयोवृद्धांनी आधार कार्ड, पासबुक, रेशन कार्ड रहिवास दाखला पासपोर्ट फोटो वगैरे सह गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे उपस्थित रहावे आणि योजनेचा लाभ घ्यावा , असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

औद्योगिक विकासातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणार : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

Next Post
जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add