Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बँकेच्या रांगेत महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.गोऱ्हे यांच्याकडून स्वखर्चातून २ लक्ष रुपयांची घोषणा

team by team
August 25, 2024
in राजकीय
0
बँकेच्या रांगेत महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.गोऱ्हे यांच्याकडून स्वखर्चातून २ लक्ष रुपयांची घोषणा

नंदुरबार l प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. यानिमित्ताने नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा जवळील  सोरापाडा  येथील कालिका माता मंदिर सभागृहात २४ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.आमदार आमश्या पाडवी व शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व देवीची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

नंदुरबार मधील रस्ते चांगले व्हावे ही सर्वांची इच्छा असून, पुढच्या सहा महिन्यांच्या आत नंदुरबारचे रस्ते चांगले करू, तसेच आतापर्यंत ७० कोटी रुपयांपर्यंत निधी रस्त्यासाठी दिला असून, येणाऱ्या काळात अजून निधी मिळावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित जनतेला सांगितले.

लाडकी बहिण योजनेत जर कोणी मी एजंट किंवा दलाल आहे असे सांगत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका , असा इशारा यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिला.

अक्कलकुवाला जिल्हा उपरुग्णालय व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.पिंपलखुंटा येथे तालुका रुग्णालय लवकरच होईल अशी ग्वाही यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिली.

महिलांना बँकेमध्ये होत असलेल्या त्रासामुळे, त्यांना बँकेच्या रांगेत उभे राहण्यास अडचण होऊ नये, तसेच खूप वेळ बँकेच्या रांगेत उभे राहिल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी महिलांना चहा पानाची व्यवस्था करणार असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.तसेच यासाठी स्वखर्चातून लक्ष रुपयांचा देत असल्याची घोषणा यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केली.

‘जेव्हा ही योजना घोषित करण्यात आली, त्यानंतर विरोधकांनी या जिल्ह्यात खोटा प्रचार करायला सुरवात केली. ही योजना खोटी आहे.पण तेव्हा मी सर्वांना सांगितले की गरिबांना भेटणाऱ्या १५०० रुपयांची किंमत किती मोठी आहे, तसेच कोणीच या योजनेपासून वंचित राहणार नाही’ असे देखील यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी नमूद केले.

आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक योजना आल्या पण महिलांसाठी योजना आणणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांनी महिलांचा सन्मान केला असे प्रतिपादन यावेळी श्रीमती.संगीता चव्हाण यांनी कार्यक्रमात बोलताना केले.

आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमश्या पाडवी यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले.

यावेळी संगिता चव्हाण (महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य)पर्णिताताई पोंक्षे (नंदुरबार जिल्हा महिला संपर्क प्रमुख), आमश्या दादा पाडवी (विधान परिषद सदस्य),शंकर पाडवी (समाज कल्याण सभापती जि.प. नंदुरबार), जवराबाई पाडवी( सरपंच कोयलीविहीर),उषाताई बोहरा (सरपंच अक्कलकुवा),अंजुताई पाडवी(सरपंच सोरापाडा),तसच सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, लाडकी बहिन योजना लाभार्थी, महिला व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. याच्या उपस्थितीत काढण्यात आली वृक्षदिंडी

Next Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add