Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लाडकी बहिण योजनेचे फार्म भरण्यासाठी नेटवर्कसाठी डोंगर माथ्याचा आधार

team by team
July 22, 2024
in सामाजिक
0
लाडकी बहिण योजनेचे फार्म भरण्यासाठी नेटवर्कसाठी डोंगर माथ्याचा आधार

नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फार्म भरण्यासाठी नेटवर्कचा शोधत वेहगी,बारीपाडा ता अक्कलकुवा येथील माता-भगिनींना डोंगर माथ्याचा आधार घ्यावा लागतो.

 

महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्तरातून पुढाकार आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे.

 

महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

 

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण, सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला 1 वर्षात 18 हजार रूपये मिळणार आहेत.

 

 

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यादृष्टीने आपल्या शासनाने अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत.

 

 

यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. ग्रामीण दुर्गम, डोंगराळ भागातील महिला ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी मोबाईलला रेंज मिळावी यासाठी डोंगर डोंगर फिरत फिरत आहेत.तासनतास रेंज साठी पाणी पावसात डोंगराच्या माथ्यावर थांबावे लागते, रेंज मिळालीच तर पुर्ण फार्म भरला जाईल याची शाश्वती नसते.याबाबत महिलांना फार्म भरण्यासाठी मदत करणारा दिलीप वळवी म्हणाला कि, शहरात किंवा टावर असलेल्या गावी फार्म लवकर भरले जातात पण पाणी पावसात बसअभावी तीस चाळीस किलोमीटर पायपीट करीत , नदीच्या पाण्यातुन बाजारपेठला जाणे ही अशक्य आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड,१२ संशयितांवर गुन्हा

Next Post

नंदुरबार येथे जुगार अड्ड्यांवर धाड,३० संशयितांवर गुन्हे दाखल

Next Post
नंदुरबार येथे जुगार अड्ड्यांवर धाड,३० संशयितांवर गुन्हे दाखल

नंदुरबार येथे जुगार अड्ड्यांवर धाड,३० संशयितांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add