Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील सरपंचांची बैठक; शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा, संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींचे शिवसैनिकांना आवाहन

team by team
July 16, 2024
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील सरपंचांची बैठक; शिवसेना सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करा, संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींचे शिवसैनिकांना आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडून अनेक महत्त्वकांशी योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजना जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून शिवसेनेची सदस्यता नोंदणी करून घ्यावी असे आवाहन धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी आमदार कार्यालयात नंदुरबार तालुक्यातील विविध गावातील सरपंचांची बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी माजी आमदार रघुवंशी बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी,पं.स सभापती अंजना वसावे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,पं.स उपसभापती संतोष साबळे,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प देवमन पवार,बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी यांच्यासह विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आमदार कार्यालयात नोंदणीची सुविधा करण्यात आलेली आहे. सरपंचांनी देखील आपापल्या गावांमध्ये महिलांमध्ये योजनेची जनजागृती करावी. जास्तीत जास्त महिलांचे फॉर्म भरून घेण्यात यावेत.

सदस्यता नोंदणी यशस्वी करा; संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी

सध्या शिवसेनेची सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. शिवसेनेचे कार्य जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना सदस्य करून घ्या. गाव पातळीवर कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करून सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करावे असे आवाहन संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमबजावणीसाठी सर्व स्तरातून पुढाकार आवश्यक : पालकमंत्री अनिल पाटील

Next Post

नंदुरबार पालिकेला मिळाल्या ५ फायर बाईक, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचणार; माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add