Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीतील जाचक अटी त्वरित रद्दबातल करण्याची मागणी, नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रशासनाला निवेदन

team by team
June 24, 2024
in राजकीय
0
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीतील जाचक अटी त्वरित रद्दबातल करण्याची मागणी, नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रशासनाला निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी-

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. तसेच जाचक अटी रद्दबातल करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावरून शासनास अहवाल पाठविण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांच्यासह समाज बांधवांनी निवेदनातून दिला आहे.

 

याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले. नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी हरिश भामरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी यांना एकाच दिवशी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये समान धोरण नावाखाली दि. ३० ऑक्टोंबर २०२३ रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार जाचक अटी घातल्या आहेत. इयत्ता दहावी, बारावी व पदवीला ७५ टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्काला ३० ते ४० लाखांची मर्यादा घातली आहे.

 

त्यामुळे दलित विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी परदेशी शिष्यवृतीचा संपूर्ण खर्च हा शासनाकडून उचलला जात होता. यामध्ये शिक्षण शुल्क, विमान भाडे, मासिक निर्वाह भत कता आदींचा समावेश होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुजन समाजातील गरजु विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी समान धोरण आखले आहे. त्यामुळे आताच्या परिपत्रकेनुसार पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी ३० लाख आणि पी.एच.डी. करीता ४० लाखांची मर्यादा घालण्यात आली आहे. वार्षिक १२ लाख रुपये निर्वाह भत्ता यातच समाविष्ट करण्यात आलेला आहे.

 

 

अशा अभ्यासक्रमासाठी सध्या विद्यापीठांचे शुल्क ६५ ते ९० लाख असल्याने साहजिकच शासनाची शिष्यवृत्ती अपुरी पडते. तसेच ८ लाखांची उत्पन्न मर्यादाच असणारा विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार असल्याने अशा उमेदवाराचे वार्षिक ५० लाखांचे शिक्षण शुल्क कुठून द्यावे हा गंभीर प्रश्न आहे. तसेच पदव्युतर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास पुढे पी.एच.डी. साठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. असाही बदल करण्यात आलेला आहे.

 

 

त्यामुळे साहजिकच सरकार ८ लाखांची उत्पन्न मर्यादा आणि ७५ टक्के गुणांची अट घालुन संविधानातील तरतुदींनाच बगल देत आहे. या संदर्भात गंभीर दखल घेऊन त्वरीत जाचक अटी रद्दबातल करण्यासाठी जिल्हास्तरावरून अहवाल शासनाला पाठवावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, कार्याध्यक्ष विजय अहिरे, माजी युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र अहिरे, चर्मकार समाजाचे नवापूर अध्यक्ष छोटू अहिरे, लक्ष्मण चव्हाण, दिलीप मोरे, राजू ठाकरे, महेंद्र गवळे, वसंत वसईकर, बलदेव वसईकर, छोटू अहिरे, संतोष अहिरे, गणेश अहिरे, राजेश अहिरे, दीपक कापुरे आदींनी निवेदनातून दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना

Next Post

28 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा

Next Post
28 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा

28 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add