√नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास निनावी दूरध्वनीद्वारे प्राप्त तक्रारीच्या आधारे मेवास अकुंशविहीर ता.अक्कलकुवा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
दूरध्वनीद्वारे 24 जून 2021 रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ,आणि समुपदेशक गौरख पाटील यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, व आशा सेविका यांच्यासोबत चर्चा करून घटनेचे गांभिर्य लक्षात आणून दिले.
समितीने बालिकेच्या वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना करत असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायदा व त्यातील शिक्षेच्या तरतुदीबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. तसेच बालिका आणि तिच्या 13 वर्षीय बहिणीला बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे याबाबत समुपदेशन करुन दोघांना बाल संगोपन योजनेविषयी माहिती जन साहस संस्थेच्या समुपदेशक अनिता गावित यांनी दिली.
बालविवाह रोखण्यासाठी अक्कलकुवा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, जन सहा संस्थेचे जिल्हा समन्वयक विकास मोरे,