Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट; रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा

team by team
April 27, 2024
in राजकीय
0
डॉ.हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट; रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा

नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले.

नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासीयांना धक्का देणारी ठरली आणि त्यामुळेच रघुवंशी व गावित यांची भेट शहरवासीयांच्या चर्चेची सुद्धा बनली.

अधिक वृत्त असे की, श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून नंदुरबार शहरात प्रचाराला शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी माननीय एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी आमदार माननीय चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली तसेच आशीर्वादही घेतले. माननीय चंद्रकांत रघुवंशी यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन डॉ.हिनाताई गावित यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, आनंदा माळी, माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. एकनाथराव शिंदे गटाची शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असतानाही लोकसभा निवडणूक प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिनाताई गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली ही भेट चर्चेचा मोठा विषय बनली.

दरम्यान डॉ. हिनाताई गावित यांनी शहीद स्मारक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबून अभिवादन केले. ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी आणि तत्सम मान्यवरांच्या घरी भेट दिली. माजी नगराध्यक्षा इंदू काकू चौधरी, माजी नगरसेविका अनिता पाटील यांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून डॉ.हिना गावित यांनी केला प्रचाराचा जोरदार शुभारंभ

Next Post

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

Next Post
पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

पोलीस अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add