नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी पहिल्या दिवशी ३० नामांकनांची विक्री झाली.यात खा.हिना गावीत व ऍड. गोवाल पाडवी यांच्या नावे ही अर्ज घेण्यात आले.
नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी नामांकन अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काल पहिल्या दिवशी ३० अर्जाची विक्री झाली. यात भाजपा व काँग्रेसकडून प्रत्येकी १२, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक ३ तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्जाची खरेदी केली आहे. काल पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नाही.