नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शहर पोलीस निरीक्षकपदी वासुदेव देसले यांनी दि. 28 मार्च रोजी शिवजयंती दिनी पदभार स्वीकारला आहे.
नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची मुख्यालयात बदली झाली असून नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार वासुदेव देसले यांनी स्वीकारला आहे.
मूळचे जळगाव येथील वासुदेव देसले यांनी यापूर्वी पोलीस प्रशासनात नाशिक, सटाणा, कळवण, मालेगाव, शिर्डी, कोपरगाव, आणि नागपुर या शहरांमध्ये सेवा बजावली आहे. नंदुरबार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.