नंदुरबार l प्रतिनिधी
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी शहादा तालुक्यात दौरा करून काही भेटीगाठी घेतल्याचे चर्चा असून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक मैदानात एकनाथराव खडसे देखील उतरल्याचे यावरून दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात संपर्कासाठी आले होते. त्याप्रसंगी काँग्रेसचे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ त्यांनी भेटीगाठी घेतल्या.
शहादा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेतच त्यांनी शहादा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथराव खडसे यांनी या भेटीसाठी घेतल्या त्याप्रसंगी त्यांच्या समावेत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रक्षा खडसे यांचे वडील जगदीश पाटील हे सुद्धा उपस्थित होते असे समजते.