नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील फ्रँकलिन मेमोरियल चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त एस ए चर्चेस तर्फे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च तर्फे गुड फ्रायडे निमित्त चर्चमध्ये काल सकाळी प्रार्थना घेण्यात आली. यावेळी अकोला येथील बायबल महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यासागर गायकवाड यांनी प्रवचन दिले यावेळी गुड फ्रायडे चे महत्व कथन केले. यावेळी वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताचे सात वाक्यांचे महत्त्व कथन केले.
यावेळी कार्यक्रमाला चर्च चे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्याध्यापिका नूतनवर्षां वळवी, प्रेमानंद लवले, मार्था सुतार, सुरेश जाभिलसा, सबस्टीन जयकर, सत्यजित नाईक, विश्वास पाडवी, दिलीप नाईक, संदेश यंगड, डॉ राजेश वसावे, हर्षानंद कालू, सुरेश डोंगरे, राजेंद्र व्यास, दिलीप वळवी, डॉ मधुकमल हिवाळे, कांता वळवी, कुसुम व्यास, नंदा वसावे, आर के वळवी, स्नेहलता कालू, संदीप पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.