Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विरोधकांना प्रभावी होण्याची संधी न देता आपण केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवा : खा.डॉ.हिना गावित

team by team
March 29, 2024
in राजकीय
0
विरोधकांना प्रभावी होण्याची संधी न देता आपण केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवा : खा.डॉ.हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दूर दूर पर्यंत कुठेही आपल्या विरोधी पक्षाचे कामाच्या स्वरूपातील अस्तित्व दिसत नाही त्या तुलनेत मोदी सरकारने गरिबांचे उत्थान करणाऱ्या योजनांच्या माध्यमातून केलेले काम आणि गाव विकासाचे काम प्रत्येक तालुक्यात पाहायला मिळते. त्या बळावर आपणच निवडणूक जिंकून जाऊ;

या भ्रमात मात्र कार्यकर्त्यांनी राहू नये. आपल्या कार्यपद्धतीला आणि विचार धारेला विरोध करणारा वर्ग प्रत्येक तालुक्यात आहे हे लक्षात घ्या आणि त्यांना प्रभावी होण्याची संधी न देता आपण केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवा; असे आवाहन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रबंधन समितीच्या बैठकीत मार्गदर्शनपर भाषणातून केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट येथे ही बैठक पार पडली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यातील विविध 37 समित्यांचे प्रमुख आणि सदस्य देखील उपस्थित होते.

महामंत्री विजय चौधरी यांनी याप्रसंगी समिती प्रमुखांना दिलेली जबाबदारी आणि त्या अनुषंगाने करावयाचे संपर्क कार्य याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, सत्तेत असताना सुद्धा गेल्या पाच वर्षाच्या काळात आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली कोरोना महामारी प्रसंगात विविध स्वरूपात मदत पोहोचवून लोकांचे प्राण वाचवले मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असून त्या बळावरच खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना आपल्याला साडेचार लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे लक्ष पूर्ण करावयाचे आहे, आणि म्हणून झटून कामाला लागा; असेही विजय चौधरी यांनी आवाहन केले. लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे यांनी समितीप्रमुखांनी समन्वय कसा साधावा यावर मार्गदर्शन केले.

भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख जितेंद्र पाटील, महिला मोर्चा प्रमुख संगीता जयस्वाल, प्रतिभा चौधरी, महेंद्र पाटील, माणिक माळी, प्रकाश चौधरी, शेखर माळी, लतेश मोरे, आनंद माळी, केतन रघुवंशी, लक्ष्मण माळी, ईश्वर साठे यांच्यासह शिरपूर साक्री शहादा नवापूर अक्कलकुवा धडगाव तळोदा नंदुरबार या सर्व तालुक्यातील समिती प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ. हिना गावित यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आशीर्वाद; मुंबईत घेतली प्रत्यक्ष भेट

Next Post

व्हाट्सॲपवर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून प्रचार, कर्मचारी निलंबित

Next Post
व्हाट्सॲपवर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून प्रचार, कर्मचारी निलंबित

व्हाट्सॲपवर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून प्रचार, कर्मचारी निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add