Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्नीशी वाद, सुपारी देऊन जावयाने केला सासऱ्याचा खून

team by team
March 20, 2024
in क्राईम
0
पत्नीशी वाद, सुपारी देऊन जावयाने केला सासऱ्याचा खून

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा एसटी महामंडळातील आगाराचे वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) यांच्या खुनाचा गुन्हा उघड झाला असून प्रेमविवाहातून पत्नीशी झालेल्या वादातून सासऱ्याच्या खुन झाल्याचे समोर आले आहे.जावई याने तीन लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांसह जावयालाही अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील नांदर्डे शिवारातील फरशी पुलाखाली दि. १६ मार्च रोजी किराणा घेण्यासाठी गेलेले शहादा आगारातील वाहक राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळला होता.त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

राजेंद्र मराठे यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या नंदूरबार येथील गोविंद सोनार याचे कालांतराने पत्नीसोबत बिनसले होते. यातून त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद होत होते. वादातून गोविंद हा त्याच्या मुलाला घेऊन नंदुरबार येथील आई- वडिलांकडे राहत होता. पत्नीसोबतचा वाद टोकाला गेल्याने गोविंद याने थेट सासऱ्याची सुपारी देऊन खून केला.

मयत राजेंद्र मराठे हे शहादा आगारात वाहक असल्याने त्यांची बसस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये ओळख होती. यातून या ठिकाणी काम करणारे नीलेश बच्चू पाटील (२४) आणि विक्की किशोर बिरारे (२३) यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता. याची माहिती जावई गोविंद सुरेश सोनार (३५) याला होती. यातून त्याने या दोघांसोबत संपर्क करुन तीन लाखांत राजेंद्र मराठे यांच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती आहे. १४ रोजी मुलासोबत किराणा करण्यासाठी आलेल्या मराठे यांना या दोघांनीच आपल्यासोबत नेले होते. दोघांसोबत या गुन्ह्यात दोघे अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

खून केल्यानंतर चौघेही सुरत मार्गाने मुंबईत गेले होते. कांदिवली येथे हेअर सलूनमध्ये केस कापत असताना एलसीबीच्या पथकाने चौघांना अटक केल्यावर त्यांनी राजेंद्र मराठे यांचा खून केल्याची कबुली दिली. मोबाईल लोकेशन नांदर्डे शिवारात असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
नंदुरबार एलसीबीच्या पथकाने कांदिवली येथून नीलेश बच्चू पाटील (वय २४) आणि विक्की किशोर बिरारे (२३) आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते. या चौघांनी गोविंद सुरेश सोनार (३४, रा.नंदुरबार) याने तीन लाखांची सुपारी दिल्याने खून केल्याची कबुली दिली होती. गोविंद सोनार याला पोलिस पथकाने नंदुरबारातून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी  संशयितांना पकडण्याची मोहीम राबवली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ.हिना गावित ‘डॉक्टरकी’ला अशा जागल्या

Next Post

नंदुरबारच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत यश; ५ मिनिटात सोडवले १०० प्रश्न,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add