Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपोषणावर तातडीने निर्णय व्हावा – रणजीतसिंग राजपूत

team by team
February 22, 2024
in राजकीय
0
राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी उपोषणावर तातडीने निर्णय व्हावा – रणजीतसिंग राजपूत

नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाविषयी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रणजीतसिंग राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजपूत समाजास जात प्रमाणपत्राचे अडचणी सोडवाव्यात, महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. इत्यादी प्रलंबित मागण्यासाठी राजपूत समाजातर्फे युवा नेते गिरीश परदेशी पाचोरा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत. यापूर्वी
पाचोर्‍याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चेद्वारे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने जळगाव येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते.

राजपूत जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणेबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय व्हावा व महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ 15 जानेवारी पर्यंत होईल असे नामदार अतुल सावे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेवर सभागृहात जाहीर करून देखील मुहूर्त निघाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजात असंतोषनिर्माण झाला असून लवकरच आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणी रणजीतसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे निवेदनाद्वारे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित  पवार, मंत्री अतुल सावे यांना देखील प्रत्यक्ष भेटून रणजीतसिंग राजपूत यांनी राजपूत समाजाच्या मागण्यां विषयी चर्चा केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील सिध्देश्वर व उपसा सिंचन योजनेच्या सिव्हिल कामाचा शुभारंभ

Next Post

शिवसेना उ.बा.ठा ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
शिवसेना उ.बा.ठा ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना उ.बा.ठा ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add