नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते तथा खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी धडगाव येथे शिवसेना (शिंदे गट) मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवसेनेचा मेळावा धडगाव येथे गुरुवार (दि.२२) फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. मेळाव्याची जैय्यत तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते तथा खा.डॉ श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बंदरे व खणीकर्म, सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, धुळे- नंदुरबार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी उपस्थित राहतील.
मेळाव्याला शिवसेनेचे जि.प सदस्य, पं.स सभापती, उपसभापती, सदस्य, पालिकेचे नगरसेवक, बाजार समितीचे सभापती, उपसभापती,संचालक, ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध सोसायटी संस्थांचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हज्जारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजयसिंह पराडके,धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, जि.प सदस्य रवींद्र पराडके,युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांनी केले आहे.