नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात नंदुरबार तालुक्यातील डोंगरपाडा ( लोय) येथील बबिता रोशनराज पाडवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धात्मक उपक्रमा साठी शालेय शिक्षण विभागाने महिला बालकल्याण विभागातिल अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांचा समावेश केला होता .यासाठी अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पदवी यांनी पोषण भी पढाई भी हा नवोपक्रम सादर केला होता , या नवोपक्रमास पूर्व प्राथमिक गट अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या गटातून प्रथम क्रमांक मिळाला आहे नुकत्याच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संचालक राहूल रेखावर, सहसंचालक शोभा खंदारे, विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय थिटे उपस्थित होते.या नवोपक्रमसाठी बबिता रोशनराज पाडवी यांना एकात्मिक बाळविकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार साईनाथ वंगारी व पर्यवेक्षिका सी.एम. वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे अधिव्याख्याता डॉ वनमाला पवार व डायटमधील सर्व अधिकारी तसेच आयआयटी मुंबई डॉ रुपल दलाल मँम संदीप घुसाळे या सर्वांनी मार्गदर्शन केले.