नंदुरबार l प्रतिनिधी
येथील तांबोळी बारी चौक परिसरातील सिटी पार्क मध्ये दि.17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध मुर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील नळवा रोड परिसरातील तांबोळी बारी चौक जवळील सिटी पार्क मध्ये लोक वर्गणीतून भव्य असे श्री विठ्ठल रुक्मणी यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात विठ्ठल, रुक्मिणी, गणपती, शिवलिंग, हनुमान, तुळजाभवानी आदी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास दि.16 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. दि.16 फेब्रुवारी रोजी विविध मुर्त्यांची सायंकाळी सहा वाजता परिसरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. दि. 17 फेब्रुवारीला प्रथम शांतीसूक्त पठण कार्यक्रम होईल. त्यात प्रायचित्त संकल्प, प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, आयुष्य मंत्र जप, प्रधान देवता, जलाधिवास, मंडल देवता स्थापन, अग्नी स्थापन, सायंकाळी आरती होईल. दि.18 फेब्रुवारी रोजी द्वितीय शांतीसुक्त पठण होईल.
त्यात सर्व स्थापित देवता पूजन, शांतीपुष्टी हवन, मूल्याधिपती हवन, धान्याधिवास, ब्रह्मशिलापूजन हवन, आरती शैय्यादिवस आदी कार्यक्रम होतील.
दि.19 फेब्रुवारी रोजी तृतीय शांतीसूक्त पठणाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप होईल. यावेळी संप्राप्त पूजन, शैय्याधिवास निवृत्ती, मूर्ती सुलग्न, ध्वजारोहण, प्रथम देवता पूजन, कलश स्थापना, उत्तरांग हवन, बलिदान पूर्णाहुती आदी कार्यक्रम होतील. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य वेदमूर्ती मंदार चंद्रात्रे येणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.