नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात महिला सुरक्षा कायदा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांसंदर्भातील कायद्यांविषयी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात रेझिंग डेनिमित्त महिला सुरक्षा कायदा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांचे कायद्यातील हक्क, अधिकार व कर्तव्यांची जाणिव करुन दिली. महिलांनी विचारलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले. याप्रसंगी पोकॉ.सविता तडवी, पोकॉ.जयश्री गावित, उ बाठा युवा सेनेच्या महाराष्ट्र सहसचिव मालती वळवी आदी उपस्थित होते.