शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अग्नीवीर भरती संदर्भात मुंबई एआरओचे अधिकारी सुभेदार मेजर धर्मवीर सिंग आणि हवालदार जग्थेसन के. यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पूज्य साने गुरुजी प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मेजर धर्मवीर सिंग व हवालदार जग्थेसन यांनी दिलेल्या व्याख्यानात अग्नीवीर भरती संदर्भातली प्रोसेस ,डॉक्युमेंट प्रोसेस आणि ग्राउंड प्रोसेस याविषयी अत्यंत सखोल अशी माहिती त्यांनी दिली. त्यासोबत ऑफिशियल इंट्री साठी सीडीएस, शॉर्ट सर्विस कमिशन आणि इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी यासाठी 12 वी नंतर ज्या परीक्षा असतात त्या संदर्भात सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ .एम. के .पटेल, उपप्राचार्य डॉ.एस.डी. शिंदखेडकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्रा मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास तांत्रिक साहाय्य प्रा.डाॅ. गोपाल गवई प्रा.डाॅ.मिलिंद पाटील यांनी केले.संयोजन व संचालन कॅप्टन प्रा.डाॅ.एस.एल. भालेराव यांनी केले.