Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांची 20 जानेवारी रोजी आरक्षणासाठी मुंबईला पायीदिंडी

team by team
January 20, 2024
in राजकीय
0
नंदुरबार येथून हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांची 20 जानेवारी रोजी आरक्षणासाठी मुंबईला पायीदिंडी

नंदुरबार l प्रतिनिधी

मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा एक प्रामाणिक व सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्त्व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास हजोरोंच्या मराठा समाज बांधव पायी मुंबई येथे दि.26 जानेवारी रोजी आझाद मैदानावर जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत नितीन जगताप यांनी दिली आहे.

तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गुलाब महारू मराठे हे देखील दि.27 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत.
आरक्षणाची शेवटची लढाई असून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी मुंबई येथे यावे असे आवाहन केले आहे. नंदुरबार येथून सकल मराठा समाजातर्फे शनिवार दि.20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, धुळे रोड, नंदुरबार येथे सर्व समाज बांधव एकत्र जमा होऊन मुंबईकडे निघणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समाज बंधु-भगिनी, युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने मराठा आरक्षण दिंडी (पदयात्रा) मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.सदर मोर्चा नाट्य मंदिरापासून ते अंधारे चौक, नगरपालिका, नेहरू पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, डॉ.आंबेडकर पुतळा, नवापूर चौफुली इथपर्यंत मोर्चा काढण्यात येऊन या ठिकाणापासून मुंबईकडे पदयात्रा करणार आहेत. सदर पदयात्रा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे,

या पदयात्रेमध्ये सुमारे 2 हजार 500 समाज बांधव व महिला भगिनी जाणार असून या मोर्चात एक रुग्णवाहिका व दोन तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी राहतील अशी माहिती नितीन जगताप यांनी यावेळी दिली आहे. यावेळी उमर्दे येथील उपोषणकर्ते गुलाब मराठे, नवनीत शिंदे, प्रकाश हराळ, अर्जून मराठे, विक्की मराठे आधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात न करणाऱ्या ठेकेदारांना का यादीत टाका : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उद्या रविवारी भव्य मोटरसायकल रॅली, ॲड. राम रघुवंशी यांचे सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add