Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

team by team
January 6, 2024
in राज्य
0
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांनी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

 

 

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजना ही ग्रामीण व शहरी भागासाठी राबविण्यात येत आहे.

 

 

 

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्तींना त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारचे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाचे लोक हे कच्या घरामध्ये राहतात, तसेच ग्रामीण भागातील बहुतांशी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचे लोक हे नोकरीसाठी शहराकडे आलेले असतात ते शहरामधील वाढत्या किंमतीमुळे तेथे स्वत:चे घर बांधू शकत नाही. अशा ग्रामीण व शहरी भागातील लोकांना त्यांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

 

 

या योजनेसाठी पात्रता
◼️लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
◼️लाभार्थ्यांचे राज्यात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे.
◼️लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 1 लाख 20 हजार जास्त नसावे.
◼️ लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
◼️लाभार्थ्याच्या स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
◼️लाभार्थ्यांकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे. अथवा स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
◼️लाभार्थी कुटुंबाने राज्यात अन्यत्र कोठेही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

 

 

आवश्यक कागदपत्रे
पात्र लाभार्थ्यांना सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी रजिस्टर कार्ड), ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा, घरपट्टी, पाणीपट्टी, व वीज बिल या कागदपत्रांपैकी एक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, वीज बिल, मनरेगा जॉब कार्ड आणि बँक पासबुक आदी.

 

 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तर शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांनी संबंधित नगरपालिकचे मुख्याधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावे, असेही श्री. वसावे यांनी प्रसिद्धी शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहनधारकांनी, अनुज्ञप्ती धारकांनी अभिलेख्यांचे संगणकीकरण करुन घ्यावे : किरण बिडकर

Next Post

पशुपालक व शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीरासाठी नांव नोंदणी करावी : उ. दे. पाटील

Next Post
पशुपालक व शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीरासाठी नांव नोंदणी करावी : उ. दे. पाटील

पशुपालक व शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीरासाठी नांव नोंदणी करावी : उ. दे. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add