Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजना संदर्भात बैठक उत्साहात

team by team
December 7, 2023
in राज्य
0
जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजना संदर्भात बैठक उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या आयोजनाबाबत ची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सदस्य तथा नाट्यकर्मी मनोज सोनार हे होते.

गेल्या बारा वर्षापासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन होत आहे. सदर आयोजन गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या तर्फे राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंस्था व महाविद्यालये सहभागी होऊन आपला नाट्याविष्कार सादर करीत असतात. सदर बैठकीत जिभाऊ करंडक स्पर्धेत सहभागी होणारे संघ व कलावंत स्पर्धकांचे नियोजन या बाबत चर्चा करण्यात आली.

तसेच या बैठकीदरम्यान नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत आपले विचार मांडले. तसेच या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालय व विविध नाट्यसंस्था यांना भेटी देऊन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येईल असे देखील सांगितले. जिभाऊ करंडक ही स्पर्धा महाराष्ट्रातील प्रमुख एकांकिका स्पर्धेपैकी एक स्पर्धा आहे. या जिभाऊ करंडक मुळे नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून जिभाऊ करंडक च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील नाट्यसंस्था देखील सहभागी होतील असा विश्वास देखील नागसेन पेंढारकर यांनी व्यक्त केला. या स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना व रसिकांना विविध नाट्य अविष्कार अनुभवयास मिळत असतात. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात नाट्यकलावंत व नाट्यतंत्रज्ञ देखील तयार होत आहेत असे मत मनोज सोनार यांनी व्यक्त केले.

जिभाऊ करंडकच्या या बैठकीत नाट्यकर्मी राजेश जाधव, विश्व हिंद धर्म सेवा संस्थेचे अध्यक्ष कुणाल वसईकर, रविंद्र कुलकर्णी, तुषार ठाकरे, काशिनाथ सूर्यवंशी, आशिष खैरनार यांनी जिभाऊ करंडकच्या नियोजनाबाबत आपले मत व्यक्त करीत जिभाऊ करंडक यशस्वी होण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. या बैठकीत राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी कलावंतांचे कौतुक करण्यात आले. जिभाऊ करंडक च्या या बैठकीत जितेंद्र खवळे, तुषार सांगोरे, पुरुषोत्तम विसपुते, जितेंद्र पेंढारकर, पार्थ जाधव, रोहित हराळे, चंद्रमणी गोल्हाईत, सागर कदम, रत्नदीप पवार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार बसस्थानकावरील शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

तळोदा येथे बाल कामगार शोधार्थ कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून संयुक्त कारवाई

Next Post
तळोदा येथे बाल कामगार शोधार्थ कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून संयुक्त कारवाई

तळोदा येथे बाल कामगार शोधार्थ कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याकडून संयुक्त कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add