Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेती साहित्यासह कापूस चोरणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
December 7, 2023
in क्राईम
0
शेती साहित्यासह कापूस चोरणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

शेती साहित्य, कापूस, ऑईल व मोटार सायकल चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद करण्यात आल्या असून एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 क्विटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटार सायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करीत 4 गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याला यश आले आहे.
अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 

 

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.

 

 

 

4 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धामडोद येथील शेतातील पाण्याची मोटर चोरी करणारे हे भागसरी ता. जि. नंदुरबार येथील आहेत. चोरी केलेल्या पाण्याच्या मोटरी त्यांनी शेतांमध्ये लपवून ठेवलेल्या असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना कळवून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

 

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भागसरी गावात जावून संशयीत आरोपीतांची माहिती काढून रंजित अमर भिल, श्रीनाथ सुकलाल भिल , सागर रविंद्र भिल, कृष्णा प्रल्हाद भिल सर्व रा. भागसरी ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना धामडोद येथील शेतातून चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटरबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे देवू लागले म्हणून पथकाने संशयीत इसमांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून 98 हजार रुपये किमतीच्या 7
इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे दाखल आहे.

 

 

 

तसेच शेख शकील शेख युसुफ कुरैशी यांच्या नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खामगांव शिवारातील शेतातील घराचे कुलूप तोडून 56 हजार रुपये किमतीचा कापुस चोरुन नेला म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नितेश प्रविण ठाकरे रा. खामगांव ता. जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केली असल्याची माहिती दिल्याने मच्छींद्र अनिल भिल, राहुल विनोद पाडवी सर्व रा. खामगांव ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 56 हजार रुपये किमतीचा 8 क्विटल कापुस हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या बातमीच्या आधारे 28 नोव्हेंबर 2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे खुर्द गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरमधून 300 लीटर ऑईल चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी गोपाल कैलास राजपुत रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार, मोतीलाल लक्ष्मण माळी रा. इंद्राहटटी ता. जि. नंदुरबार, रोहित प्रभाकर धनगर रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार यांना देखील ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुझलॉन टॉवरमधून चोरी केलेले 26 हजार 460 रुपये किमतीचे 270 लीटर ऑईल जप्त करण्यात आले असून आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

तसेच शहादा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 379 मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून 20 हजार रुपये किमतीची एक मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेली असून अल्पवयीन मुलास पुढील चौकशीकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

 

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शेती साहित्य, कापूस, ऑईल व मोटार सायकल चोरी करणारे वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण 10 आरोपी व एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 7 क्विटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटार सायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करुन 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील सांगितले.

 

 

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, प्रतीक भिंगारदिवे, पोलीस हवालदार मोतीराम बागुल, गुलाब तेले, पोलीस नाईक बापु बागुल, विशाल नागरे, सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, रमेश साळुंखे, एकनाथ ठाकरे, सरवरसिंग वसावे, पोलीस अंमलदार शोएब शेख, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, सचिन सैंदाणे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आमलाड येथे अवैध मद्यासह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार बसस्थानकावरील शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार बसस्थानकावरील शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार बसस्थानकावरील शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add