Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व वात्सल्य सेवा समितीमार्फत प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

team by team
December 4, 2023
in Uncategorized
0
 राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व वात्सल्य सेवा समितीमार्फत प्रकल्प सादरीकरण स्पर्धा

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील डी.आर.हायस्कूल मध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद,जिल्हा समन्वयक वात्सल्य सेवा समिती नंदुरबार यांच्यातर्फे विद्यार्थ्यामध्ये बाल वैज्ञानिक घडवा म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदचे आयोजन २ व ३ डिसेंबर रोजी करण्यात आले.त्याचे उद्घाटन डी.आर.हायस्कूल चे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांच्या हस्ते करण्यात आले .

या प्रसंगी पर्यवेक्षक  हेमंत खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वात्सल्य सेवा समितीचे उपाध्यक्ष आशिष वाणी यांनी या उपक्रमाची रूपरेषा प्रास्ताविकातून मांडली.उद्घाटक श्रीराम मोडक यांनी विविध शास्त्रज्ञांचे
शोध लावण्या मागची शोधक वृत्ती सांगत अशी वृत्ती विकसित करून समाजापुढे असलेल्या विविध समस्या सोडवून मानवी जीवन उंचावण्याचे आवाहन केले.
यंदाच्या वर्षी लहान गट इ. ५ ते ७ वीमध्ये  ९३ प्रकल्प तर मोठा गट इ.  ८ ते १० वीच्या गटात ९९ प्रकल्प  सादर होणार आहे. सदर उपक्रम भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी देशभरातील १० ते १७  वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येत असते.या बाल विज्ञान परिषदेत दोन मुलांचा एक गटाने आपल्या सभोवतालच्या परिस्थितीतील समस्या शोधून त्याचा वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करून एक लघु संशोधन प्रकल्प सादर करावयाचा असतो. ही कोणतेही मॉडेल मेकिंग स्पर्धा नसते.

या वैज्ञानिक प्रकल्पात निरीक्षण पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि प्रयोग पद्धतीचा सुयोग्य वापर करून सहा मिनिटात  चार्ट किंवा पीपीटी च्या साह्याने प्रकल्पाचे सादरीकरण करावयाचे असते.या वर्षी या उपक्रमाचे मुख्य विषय आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे,उपविषय तुमची परिसंस्था जाणून घ्या,आरोग्य, पोषण आणि स्वास्थ्य जोपासणे,परिसंस्था आणि आरोग्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धती,आत्मनिर्भरतेसाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टीकोन परिसंस्था आणि आरोग्यासाठी तांत्रिक नवकल्पना ई विषय आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आशिष वाणी यांनी केले तर सूत्र संचलन श्रीराम  दाउतखाने यांनी केले. तर आभार  नीरज देशपांडे यांनी मानले.या कार्यक्रमाचे संयोजन  मंगेश उपासनी  व  महेश जोशी यांनी केले.या प्रसंगी उपक्रमात सहभागी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कालभैरव जयंती निमित्त उद्या महाप्रसादाचे आयोजन

Next Post

जिल्हा नियोजनाच्या सुमारे ४३२ कोटी ८५ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

Next Post
जिल्हा नियोजनाच्या सुमारे ४३२ कोटी ८५ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

जिल्हा नियोजनाच्या सुमारे ४३२ कोटी ८५ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add