Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बारमाही रस्ते देण्यासोबतच दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणण्याची योजना राबवणार : खा.डॉ.हिना गावित

team by team
November 11, 2023
in राजकीय
0
बारमाही रस्ते देण्यासोबतच दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणण्याची योजना राबवणार :  खा.डॉ.हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

तोरणमाळ पासून खालच्या भागातील गाव पाडे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ते वीज पाणी आणि अन्य सुविधांपासून वंचित राहिले. ही मोठी दुरावस्था आहे. परंतु ही सर्व स्थिती पालटण्यासाठीच मी खासदार बनले असून भादल गावासह नर्मदा काठच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना राबवली जाईल, बारमाही पक्के रस्ते देण्याबरोबरच या भागात वीज खांब देऊ तसेच येथील कुडाच्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे दिली जातील; अशी ग्वाही संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला नर्मदा काठावर असलेल्या भादल या गावात श्री शंकर आदिवासी विकास बहुउद्देशिय संस्था, धनाजे बु., ता.धडगांव आणि श्वेता रूरल फाऊंडेशन, धडगांव यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एकच ध्यास सामाजिक विकास” कार्यक्रमांतर्गत संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार डॉक्टर हिना गावित यांनी हे भाषण केले.

प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, जिल्हा परिषद सदस्या सौ. निलीमा सुभाष पावरा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, सौ. सुरेखा लतेश मोरे, एडवोकेट जयश्री गावित, ॠषा गावित, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पराडके, नंदुरबार येथील भाजपाचे संतोष वसईकर, माजी गटनेते आनंदआण्णा माळी, मांगूभाऊ माळी,

भादल ग्रामपंचायत सरपंच बुरकाताई पावरा, सिंधी दिगरचे सरपंच संदीप पावरा, झापी चे सरपंच जयराम पावरा, उडद्याचे सरपंच शिवा पावरा, भाबरीचे सायमल पावरा, आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि विकास योजना याविषयी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सविस्तर माहिती याप्रसंगी, दिली.

घरकुल योजना, हर घर जल योजना, आनंद शिधा, शेळी व गाय वाटप योजना यासह विविध योजनांचा लाभ घ्यायला आदिवासी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी सुभाष पावरा यांनी आपल्या भाषणातून केले तर शिवाजी पराडके यांनी भारतीय जनता पार्टी जनजातींच्या विकासासाठी करीत असलेल्या कार्याची मांडणी आपल्या भाषणातून केली.

बातमी शेअर करा
Previous Post

अतिदुर्गम भादल गावाला खा. डॉ. हिना गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला पक्का रस्ता

Next Post

आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.कारखान्याच्या हंगाम चा ऊस दर 2600 प्रति मे.टन जाहीर

Next Post
आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.कारखान्याच्या हंगाम चा ऊस दर  2600  प्रति मे.टन जाहीर

आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.कारखान्याच्या हंगाम चा ऊस दर 2600 प्रति मे.टन जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add