Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भावपूर्ण वातावरणात १०९ कन्यापूजन, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

team by team
October 22, 2023
in राजकीय
0
भावपूर्ण वातावरणात १०९ कन्यापूजन, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने १०९ कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजनाचे आयोजन मोठा मारुती मंदिर सभागृहात करण्यात आले होते.

पुजनाची सुरुवात अंबिका मातेचा महाआरतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, आरोग्य अधिकारी विशाल कांबळी, प्रा युवराज भामरे,उद्योगपती सुरेश अग्रवाल, ऍड अनिल लोंढा, ॲड.अविनाश पाटील, अशोक चौधरी, डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते. नगरपालिका शाळेतील १०० आणि मतिमंद शाळेतील ९ असे १०९ कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि जैन, अग्रवाल, सोनार समाज महिला मंडळ व भामरे ऍकेडमीचा भगिनी यांचा हस्ते करण्यात आले,

कन्यापूजन सर्व कन्यांचे पाद्यपूजा करून करण्यात आले. यानंतर सर्व १०९ कन्यांना नवीन कपडे, वाटरबॅग आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकातुन हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीत कन्यापूजन करण्याचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात एकाचवेळी १०९ कन्यापूजन करून मातृशक्तीचा सन्मान केल्याबद्दल हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांचे कौतुक करून भविष्यात असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

खा.डॉ.हिना गावित यांनी मनोगत व्यक करतांना सांगितले की, नवरात्रीत जसे आपण मातृशक्तीचा सन्मान करत आहोत त्याचप्रमाणे ३६५ दिवस ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ साठी प्रयत्न करावा लागेल. आपल्या जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर घटत असून प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. सुत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी व्यक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांचा धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी येथे दरोडा टाकणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद, 2 स्थानिक आरोपीतांसह 5 नेपाळी संशयीत ताब्यात

Next Post

कंत्राटी भरती बाबत भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात भाजपाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add