Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुर्गा दौडचे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत

team by team
October 20, 2023
in सामाजिक
0
दुर्गा दौडचे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी

 

हिंदुस्तान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवा निमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा दौडचे बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महिला सुवासिनींनी भगवा ध्वज आणि मशालधारी धारकरीं बालिका व युवतींचे औक्षण करीत कुंकूम तिलक केले.

 

 

हिंदुस्तान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते.यंदा बुधवारी चौथ्या माळे दिवशी पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गा दौंडला प्रारंभ झाला.अग्रभागी मशाल व भगवा ध्वज हातात घेऊन फेटे परिधान केलेल्या बालिकांनीी लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासोबत पांढरे वस्त्र, पांढरी टोपी, भगवा ध्वज हातात घेऊन जय श्रीराम… जय मातादी… वंदे मातरमच्या घोषणा देत धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दुर्गा दौड छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोठा मारुती मंदिर,कुंभारवाडा, गवळीवाडा, नवनाथ नगर, नवा भोईवाडा मार्गे बालवीर चौकात पोहचले.या ठिकाणी मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढण्यात आली.देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला.मंडळातर्फे पुष्पवृष्टी करीत दुर्गा दौडचे अनोखे स्वागत करण्यात आले.

 

 

 

बालवीर चौक परिसरातील महिला सुवासिनींनी औक्षण करीत स्वागत केले.स्वागत संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, गोपाल गवळी, आदींनी केले. त्यानंतर दुर्गा दौड बालवीर चौकातून नवा भोई वाडा, चव्हाण चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, साक्री नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भाट गली, शिवाजी चौक, गणपती मंदिर रोड, माणिक चौक, नगर पालिका मार्गै, दीनदयाल चौकातून खोडाई माता मंदिरावर दुर्गा दौड पोहोचली.खोडियार माता मंदिरात आरती नंतर दुर्गा दौडचा समारोप करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

रासेयोतर्फे पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छ भारत 3.0 अंतर्गत जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

Next Post

रासेयोतर्फे पुरुषोत्तमनगर येथे स्वच्छ भारत 3.0 अंतर्गत जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add